बदनापूर (जालना) - शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना सक्त ताकीद दिलेली असताना देखील स्वस्त धान्य दुकानदार कोणालाच जुमानत नसल्याचा अनुभव स्वतः नगराध्यक्ष प्रदीप साबळे यांना आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात असलेले दुकान बंद होते. धान्य घेण्यासाठी 60 ते 70 महिला त्या ठिकाणी वाट बघत होते शेवटी नगराध्यक्ष साबळे यांनी दुकानदाराला बोलवले आणि धान्य वाटप करण्याची सूचना दिली. मात्र, दुकानदाराने शासन दराने धान्य देण्यास नकार दिला शेवटी गोर गरिबांची परिस्थिती बघून बाजारातून धान्य खरेदीसाठी प्रत्येकी 500 रुपये मदत केली व दुकानदारांची तक्रार भ्रमणध्वनीवर तहसीलदार छाया पवार यांच्याकडे केली.
बदनापूरमध्ये रेशन दुकानदार जुमानत नसल्यामुळे नगराध्यक्षांनीच केली मदत
शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना सक्त ताकीद दिलेली असताना देखील स्वस्त धान्य दुकानदार कोणालाच जुमानत नसल्याचा अनुभव स्वतः नगराध्यक्ष प्रदीप साबळे यांना आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात असलेले दुकान बंद होते.
सध्या कोरोना रोगामुळे लॉकडाऊन झालेले असल्यामुळे गोर गरिबांचे अतोनात हाल होत आहे तर काही किराणा दुकानदार अव्वाच्या सव्वा भावाने अन्न धान्य विक्री करीत आहे. बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील दुकान क्रमांक चार धारकाने सर्रास लूट सुरू केल्यानंतर अधिकाऱ्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर नागरिकांनी ताठर भूमिका घेऊन दुकानदारास पावत्याची मागणी केल्याने दुकानदाराचे पितळ उघडे पडले.
त्यानंतर शासन दराने धान्य वाटप करण्यास भाग पाळण्यात आले. मात्र, 10 एप्रिल रोजी सदरील दुकानदाराने लोक सकाळी 6 वाजेपासून रांगा लावून उभे असताना दुकान उघडलेच नाही. लोकांना हाथ हलवीत परतावे लागले तर 11 एप्रिल रोजी पुरवठा विभागाचे अधिकारी त्या दुकानावर आले आणि नागरिकासमोर दुकानदारांची कान उघळणी करून दुकानदाराच्या सोयीनुसार पंचनामा करून मोकळे झाले.