महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळूसंदर्भात स्वतंत्र यंत्रणा उभी करा; महसूल अधिकाऱ्यांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरासे यांना मिळाली. त्यानुसार दिनांक 23 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी या वाहतुकीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला.

By

Published : Feb 2, 2021, 5:32 PM IST

जालना- वाळू प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यातून वाळूमाफिया, महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करीत आहेत. त्यामुळे वाळू संदर्भात स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करावी, या आणि इतर मागण्यांसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले.

जालना

उमरखेडचे प्रकरण

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरासे यांना मिळाली. त्यानुसार दिनांक 23 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी या वाहतुकीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाळू माफियांनी वैभव पवार आणि गजानन सुराशे यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. मात्र, अद्यापपर्यंत या वाळू माफियाला अटक करण्यात आली नाही. हा हल्ला करणारा वाळूमाफिया अविनाश चव्हाण याच्यासह अन्य साथीदारांना त्वरित अटक करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे.

माफियांना मोक्का लावा

वाळू चोरी हा एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. या गुन्हेगारीसाठी एकापेक्षा अनेक सहकारी यात गुंतलेले आहेत. त्यामध्ये वाहन चालक, मालक, वाळूचा व्यवहार करणारे गुत्तेदार अशा सर्वांना संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का लावा अशी मागणीही या अधिकाऱ्यांनी केली आहे.

तिसऱ्या टप्प्यात बेमुदत काम बंद आंदोलन

नायब तहसीलदारावर झालेल्या जीवघेणे हल्ल्याप्रकरणी पहिल्या टप्प्यामध्ये दिनांक 27 जानेवारीला अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात आले, आज दिनांक 2 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र स्तरावर तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेमार्फत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले, तरी देखील शासनाने याची दखल घेतली नाही तर तिसरा टप्पा म्हणजे दिनांक 8 मार्चपासून राज्यातील सर्व नायब तहसीलदार व तहसीलदार हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती विद्याचरण कवाडकर यांनी दिली.

आजच्या आंदोलनामध्ये अपर जिल्हाधिकारी पिनाटे उपजिल्हाधिकारी केशव नेटके, शर्मिला भोसले, रवींद्र परळीकर, रीना बसय्ये, गणेश निराळी, अंजली कानडे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, भाऊसाहेब जाधव, शशिकांत हदगल, नायब तहसीलदार शितल बंडगर, तुषार निकम, दिलीप सोनवणे, गणेश पोलास, स्नेहा कुहिरे आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details