महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2019, 7:41 PM IST

Updated : Jul 17, 2019, 10:42 PM IST

ETV Bharat / state

जालना जिल्हा परिषदेसमोर उपेक्षित कलावंतांचे आंदोलन

जालना जिल्हा परिषदेसमोर उपेक्षित कलावंतांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जालना जिल्हा परिषदेसमोर उपेक्षित कलावंतांचे आंदोलन

जालना - महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान या संघटनेच्या माध्यमातून जालना जिल्हा परिषदेसमोर उपेक्षित कलावंतांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या ठिकाणी कलावंत भजनाचा कार्यक्रम करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे येणाऱ्यांची लक्ष त्यांच्याकडे वेधले जात आहे.

कलावंतांच्या आंदोलनाबाबत माहिती देताना आंदोलनकर्ते

वृद्ध कलावंतांच्या मानधनाच्या बाबतीत विविध मागण्या आहेत. या मागण्या शासन दरबारी वारंवार निवेदने देऊनही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आज उपेक्षित कलावंतांनी हे आंदोलन सुरू केले आहे. वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून ते ५ हजार रुपये करावे. मानधन प्राप्त लाभार्थ्यांना महाराष्ट्रभर मोफत प्रवास सवलत देण्यात यावी. सन २०१७-१८ ची निवड प्रक्रिया बैठक ३ महिन्यापूर्वी होऊन सुद्धा तिची अंतिम मंजुरी पूर्ण झाली नाही, शासन निकषानुसार ती त्वरित मान्य करावी. या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

यासंदर्भात या संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिनांक २० जुलै रोजी निवेदन देऊन मागण्यांबाबत कारवाईची मागणी केली होती. मात्र, ती अद्याप पूर्ण न झाल्याने या कलाकारांनी आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष राम घोडके, यांच्यासह ज्ञानेश्वर जगताप, सुधाकर डहाळे, नाथा शिंदे, दशरथ थोरात, कांताबाई शिंदे, अंशीराम कणेकर, गंगुबाई ढाकणे आणि शशिकला बाई नागरे हे कलावंत सहभागी झाले आहेत.

Last Updated : Jul 17, 2019, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details