महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील ८५ पैकी ८१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

By

Published : Jan 14, 2021, 8:46 PM IST

administration ready for gram panchayat elections in jalna taluka
जालना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

जालना - तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या येथील ८५ पैकी ८१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तसेच सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान पार पडणार आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

१८ जानेवारीला मतमोजणीला -

उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी २६१ केंद्रावर मतदान यंत्रे पाठवण्यात आली आहे. तसेच याकरिता १८०० कर्मचारी आणि 20 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ही मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणीला होणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज -

या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपासून संबंधित गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक लागत असल्यामुळे बीड येथून 200 होमगार्ड तर दौंड येथून दीडशे प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच जालना तालुक्यातील संवेदनशील असलेल्या या गावांमध्ये हा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - समीर खान यांच्या घरावर एनसीबीचे छापे; कायद्यापेक्षा कोणी मोठा नसल्याची मलिकांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details