जालना - घनसांगवी तालुक्यातील पारडगाव येथे पाचशे वर्षांपूर्वीचे जोगेश्वरी भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. मंदिरावर अत्यंत विलोभनीय कलाकुसर कोरण्यात आली आहे.
जालन्यातील जोगेश्वरी भैरवनाथाचे पुरातन मंदिर, मात्र, 500 वर्षांपूर्वीची कलाकुसरीचा होत नाही उलगडा हेही वाचा - जालना : कलाकारांच्या 69 रुपयांच्या देणगीतून उभे राहिले नंदादेवीचे पुरातन मंदिर
सुमारे पाच हजार लोकवस्तीचे आणि मुस्लिम बहुल असलेल्या या गावात आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. गावाच्या एका बाजूला असलेल्या विस्तीर्ण परिसरामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारात नागदेवता आहे. या नागदेवतेचे दर्शन करून मंदिरात प्रवेश करावा लागतो. तत्पूर्वी इथेच असलेल्या 27 थरांच्या आणि 28 व्या थरावर तुळशीवृंदावन असलेल्या 5 चिरेबंदी आणि सिमेंट, विटाच्या बांधकामातील दिपमाळांचे दर्शनही मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारा वाजण्याची ही प्रथा आहे. पूर्वी चार नगारे वाजत होते. मात्र, आता दोन नगारे वाजवले जातात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर स्वच्छ, शांत परिसर मनाला शांती देतो. इथे शाळकरी विद्यार्थी मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटतात. मंदिराचा गाभारा हा पूर्णतः चिरेबंदी आणि छतावर कलाकुसर केलेला आहे.
हेही वाचा - जालना: आदर्श ग्राम 'पारडगाव'चा डोईजड पाणीप्रश्न
गाभाऱ्यामध्ये जोगेश्वरी भैरवनाथाची मोठी मूर्ती आहे. मूर्तीचा आकार जरी ओळखू येत नसला तरी भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवता म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. प्रदक्षिणा घालत असताना मंदिरावर कोरलेल्या एका विलक्षण कलाकृतीकडे लक्ष जाते. एक प्राणी त्याच्या चारी पायाखाली चार हत्तीचे पिल्ले तुडवत आहे, एक तोंडात आहे आणि एक पाठीवर आहे. अशा परिस्थितीत चालताना दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
हेही वाचा - आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा
मंदिराच्या मागच्या बाजूला पुरातन बारव देखील आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून बारवाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार बंद केल्यानंतर गाभाऱ्यामध्ये सुरक्षितता आहे. भैरवनाथांच्या समोरच पुरातन भुयार असल्याचेही सांगितले जाते. मात्र, या भुयाराचा उपयोग होमहवन करण्यासाठी केला जातो. वर्षातून चार वेळा मंदिराची पालखी निघत असल्याचेही भाविकांनी सांगितले. अशा या पुरातन मंदिराला पाहण्यासाठी नाहीतर आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी महाराष्ट्रातून दूरवरून लोक येतात. गावकऱ्यांनी देखील तेवढ्याच आत्मियतेने हा वारसा जपला आहे. पाचशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराची देखभाल दुरुस्ती आणि रंगरंगोटी वेळच्या वेळी होत असल्यामुळे आजही हे मंदिर भाविकांना खुणावत आहे.
हेही वाचा - शेतकरीवर्गाला बळ देण्यासाठी साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे - अमर हबीब
वाहन व्यवस्थेमुळे भाविकांची गैरसोय -
देव दर्शन करणाऱ्या भाविकांसोबत येथील पुरातन कलेचा वारसा बघण्यासाठी अनेक कलाकारांचा इथे ओढा असतो. मात्र, इथे जाण्यायेण्याच्या साधना अभावी भाविकांची संख्या कमी आहे. रेल्वेने जाण्यासाठी परतूर जवळ पारडगाव हे रेल्वे स्थानक आहे. इथे फक्त पॅसेंजर रेल्वे थांबते. मात्र, येथून परत जाताना तिकीट काढण्याची गरज नाही कारण येथे थांबा तर आहे परंतु रेल्वेस्थानक नाही. यामुळे सुमारे दोन किलोमीटर अंतर खाजगी वाहनाने अन्यथा पायी प्रवास करत पार करावे लागते. म्हणून वाहन व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होते.