महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात दोन केळी व्यापाऱ्यांची वीस लाखांची फसवणूक

जळगाव जिल्ह्यातील दोन केळी व्यापार्‍यांची फसवणूक झाली आहे. मुंबई आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी दोघांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgoan fraud
जळगाव फसवणूक

By

Published : Nov 1, 2020, 3:13 PM IST

जळगाव -शहरातील तसेच भुसावळ येथील दोन केळी व्यापाऱ्यांची मुंबई आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळीवाल्यांना व्यापाऱ्याचा गंडा
केळी व्यापारी सूर्यकांत मदनराव विधाते (रा. जुने बसस्थानक जवळ) यांचे मल्हारा मार्केटमध्ये जयकिसान केळी सप्लायर्स नावाचे दुकान आहे. शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन ते परराज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करीत असतात. ते राजस्थानातील अरिहंत केळी सप्लायर्ससोबत केळी खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत होते. त्या कंपनीचे मालक शिवकुमार महावीरप्रसाद जैन यांच्या मागणीनुसार २३ जून २०१७ ते १८ जुलै २०१७ या काळात वेळोवेळी केळीचा माल विधाते यांनी पाठविला. मालाची ३५ लाख ८५ हजार ३० रुपयांची एकूण रक्कम असताना, शिवकुमार जैन याने त्यांना २५ लाख ८० हजार रुपये अदा केले. उर्वरित दहा लाख पाच हजार रुपयांची रक्कम दिली नाही. विधाते यांनी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्ना केला व भेटण्‍याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनी मालकाने भेटण्‍यास टाळाटाळ केली. अखेर विधाते यांनी जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पैसे देण्यास टाळाटाळ

शालिक दौलत सोनवणे (रा. भुसावळ) यांचेदेखील मल्हारा मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांनी मुंबईतील कांदीवली येथे राहणारा व्यापारी संतोष रामनरेश गुप्ता (रा. अतुल टॉवर हिराणेवाडी, केला मार्केट) यांच्याशी व्यवहार केला होता. यात २० एप्रिल २०१८ पासून ते १५ जुलै २०१९ दरम्यान व्यवहार करण्‍यात आले. केळीची मागणी केल्यावर सोनवणे हे ट्रकभरून केळीचा माल पाठवत होते. दरम्यानच्या काळात सुमारे ३७ लाख ८२ हजार ५४२ रुपयांचा माल पाठविण्यात आला. त्यापैकी गुप्ता यांनी २७ लाख ६१ हजार ६०० रूपये ही मालाची रक्कम सोनवणे यांना पाठविली. उर्वरित रक्कम १० लाख २० हजार ९४२ रुपये दिली नाही. अनेकदा सोनवणे यांनी उर्वरित रक्कमेची मागणी केली असता, ती देण्‍यास गुप्ता याने टाळाटाळ केली. त्यानुसार सोनवणे यांनी गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details