महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांचे निधन

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले सुनील मोतीराम गायकवाड यांचे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

By

Published : Feb 3, 2020, 2:35 AM IST

sunil gaikwad
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांचे निधन

जळगाव - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले सुनील मोतीराम गायकवाड यांचे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते.

नाशिक येथील मुळचे रहिवासी असलेले सुनील गायकवाड हे जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा विभागात ते गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्ष काम सांभाळले आहे. 1993 साली त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ग 1 या पदासाठी निवड करण्यात आली होती. यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. सुनील गायकवाड यांनी अनेक ठिकाणी आपल्या कामाची छाप सोडली आहे. दरम्यान, त्यांनी अहमदनगर येथे डीआरडीएचे प्रकल्प संचालक, नाशिक, वर्धा आणि जळगाव येथे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय गटविकास अधिकारी म्हणून भुसावळ, चोपडा व सटाणा येथे काम केले आहे. जळगाव जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून बढती घेवून ते अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्‍त झाले होते. येथून ते नाशिक येथे उपायुक्‍त म्हणून त्यांची पदोन्नतीवर बदली झाली होती. यानंतर त्यांची जळगाव डीआरडीए या पदावर 2018 पासून कार्यरत होते.

लिव्हरच्या आजाराने होते ग्रस्त-

सुनील गायकवाड यांना लिव्हरचा त्रास होता. नाशिक येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातून बरे झाल्यानंतर ते ड्युटीवर जॉईन झाले होते. दोन महिन्यापूर्वी गायकवाड यांच्याकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. परंतु आठ दिवस काम सांभाळल्यानंतर त्रास होवू लागल्याने उपचारासाठी मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. नंतर नाशिक येथे उपचारासासाठी दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details