महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : सरकारविरोधात बेरोजगारांचा लाँग मार्च

या मोर्चात शेकडो बेरोजगार तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

लाँग मार्च

By

Published : Mar 7, 2019, 4:19 AM IST

जळगाव - बेरोजगार युवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी लोकसंघर्ष मोर्चातर्फे भुसावळ ते जळगाव लाँग मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चाला भुसावळ येथील डी. एस. मैदानावरून सुरुवात झाली.

भुसावळ येथून निघालेला आक्रोश मोर्चा सायंकाळी नशिराबादला पोहोचला. नशिराबाद येथे मुक्काम केल्यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता हा मोर्चा नशिराबाद येथून जळगावकडे कूच करणार आहे. मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देणार आहे. यावेळी सर्व प्रमुख राजकीय पक्षांना त्यांच्या निवडणुकीचा अजेंडा काय असेल? तरुणांना त्यांच्या जाहीरनाम्यात किती जागा असेल? याबद्दल प्रश्न विचारले जाणार आहेत, अशी माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

लाँग मार्च

या आहेत मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या-

ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरती करावी, २० टक्के कोटा त्वरित रद्द करावा, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण ,ऑर्डनन्स फॅक्टरी, महाराष्ट्र एस.टी. महामंडळातील अप्रेंटिस विद्यार्थ्यांना कायमची नोकरी द्यावी, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यावा, सर्व रिक्त शासकीय जागा भरून त्यात कंत्राटी व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य मिळावे, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details