महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पक्षसंघटन बळकट करायचे सोडून तक्रारी करणे बंद करा- रुपाली चाकणकर

मेळाव्यात रुपाली चाकणकर अडीअडचणी समजून घेत असताना महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षाविषयी तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून कोणतीही मदत न मिळाल्याबद्दल अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

रुपाली चाकणकर

By

Published : Nov 18, 2019, 8:31 PM IST

जळगाव- पक्षसंघटन बळकटीसाठी प्रयत्न करायचे सोडून नेहमी तक्रारी करणे बंद करा. पक्ष कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षाचे आदेश पाळायला शिका. तुमच्या जिल्ह्यात पक्षसंघटना बळकट करायची गरज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने महिला मेळावा

हेही वाचा -शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने सोमवारी दुपारी पक्ष कार्यालयात महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना रुपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा संघटक विलास पाटील, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता सोनवणे, अभिषेक पाटील, मंगला पाटील, वाल्मीक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने महिला मेळावा

मेळाव्यात रुपाली चाकणकर अडीअडचणी समजून घेत असताना महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षाविषयी तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून कोणतीही मदत न मिळाल्याबद्दल अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जळगावकडे दुर्लक्ष केल्यानेच पक्षाचे नुकसान झाले. पक्षाने दुर्लक्ष केले नसते तर जळगाव महापालिकेसह विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते, अशा भावना ऐकून रुपाली चाकणकर चांगल्याच भडकल्या. पक्ष कोणालाही वाऱ्यावर सोडत नसतो. अशी कारणे न सांगता पक्ष संघटना वाढीवर भर देण्याची गरज आहे. मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्यांची अल्प उपस्थिती असल्याकडे लक्ष वेधत चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. जळगावात माझ्या उपस्थितीत हा तिसरा मेळावा होत असून, प्रत्येक मेळाव्यात तेच-तेच चेहरे पाहायला मिळतात. पक्षसंघटन बळकट करा, असा सल्ला देत त्यांनी ज्या पदाधिकारी काम करत नसतील, त्यांची पदे काढण्याचा इशारा देखील दिला.

हेही वाचा -मुंबई महापौरपदाकरता शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर तर, उपमहापौरपदी सुहास वाडकर

'जे' गेलेत त्यांना पदे नाहीत -

निवडणुकीआधी एक्झिट पोलच्या आधारावर अनेक आमदार व पदाधिकाऱ्यांनी पडत्या काळात पक्ष सोडून भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, आता निवडणुकीनंतर चित्र वेगळे आहे. पक्ष सोडून गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा पक्षात यायला उत्सूक आहेत. या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतले जाईल. मात्र, त्यांना पदे देण्यात येणार नाहीत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details