जळगाव -मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी हर्षल संत हिने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर झालेल्या एनसीसीच्या संचलनात देशाचे नेतृत्व केले. 'ऑल इंडिया परेड कमांडर' म्हणून तिने पद भूषवले. यानिमित्ताने समृद्धीच्या रुपाने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ येथे झालेल्या संचालनात मुळजी जेठा महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिने ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषवले आहे. समृद्धी ही मुळजी जेठा महाविद्यालयात टीवायबीकॉमची विद्यार्थिनी आहे.
जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाची समृद्धी संत बनली 'ऑल इंडिया परेड कमांडर' हेही वाचा -प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या मंदिरात 'तिरंगी' सजावट
२६ छात्र सैनिकांची निवड
या वर्षी एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टोरेटमधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती. अमरावती एन.सी.सी. ग्रुप आणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनमधून समृद्धी हिची एकमेव छात्र सैनिक म्हणून निवड झाली होती. समृद्धीच्या या दैदिप्यमान यशामुळे मुळजी जेठा महाविद्यालाच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, १८ महाराष्ट्र एन.सी.से. बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन, प्राचार्य प्रा. एन. एन. भारंबे, कला शाखेचे प्रमुख आणि माजी एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. बी. एन. केसूर यांनी समृद्धीचे विशेष अभिनंदन केले आहे. लेफ्टनंट डॉ. योगेश बोरसे, सी.टी.ओ. गोविंद पवार, सी.टी.ओ. ज्योती मोरे, सुभेदार मेजर कोमल सिंग आणि पी.आय. स्टाफ यांनी समृद्धीच्या परेड सरावासाठी परिश्रम घेतले.
जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाची समृद्धी संत बनली 'ऑल इंडिया परेड कमांडर' समृद्धीला मिळाला बहुमान
26 जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचा बहुमान जळगावच्या समृद्धी संत हिला मिळाला आहे. लहानपणापासून तिचे एनसीसी आणि देशासाठी काम करण्याचा स्वप्न होते, समृद्धीची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणींसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
हेही वाचा -जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण