जळगाव - जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून सीसीआयकडून (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सीसीआयने 70 हजार गाठींची खरेदी केली आहे. यंदा सीसीआयने उशिराने खरेदी सुरू केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला व्यापारी व खासगी जिनर्सकडे आपला माल विक्री केला. जिल्ह्यात एकूण 2 लाख गाठींची खरेदी झाली आहे. यंदा जिल्ह्यात 15 लाख गाठींचे खरेदीचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात 5 लाख हेक्टरवर कापसाची लागवड -
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात यंदा 5 लाख 30 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता होती. मात्र जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व कापसावर झालेल्या बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे काही प्रमाणात फटका बसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खंडीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात वाढले आहेत. यासह निर्यात देखील वाढली असल्याने येत्या महिनाभरात कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडे विक्रीवर शेतकऱ्यांचा भर -
जिल्ह्यात सीसीआयचे केंद्र सुरू झाले. मात्र, त्याठिकाणी लावण्यात आलेले निकष, केंद्रापर्यत माल पोहचवण्यासाठी लागणारा खर्च, माल उतरविण्यासाठी लागणारी मजुरी, यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून खासगी जिनिंगवरच माल विक्री केली जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या मालाची गुणवत्ता चांगली आहे, अशा मालाला सीसीआयच्या केंद्रावर चांगला भाव मिळत आहे.
जिल्ह्यातील कापसाला गुजरातमध्ये मागणी -