जळगाव - जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू विनोद अहिरे ( Police Head Constable Vinod Ahire Set Record ) यांनी पोलीस वसाहतीतील एक किलोमीटरच्या रोड ट्रॅकवरून सलग 63 किलोमीटर स्केटिंग करून महाराष्ट्र पोलीस सप्ताह ( Police Raising Day At Jalgaon ) साजरा केला. पोलीस दलात वीस वर्ष सेवा झालेले 44 वर्षावर असलेले जवान आहेत. 63 किलोमीटर स्केटिंग ( Vinod Ahire Set Record In Skating ) करून पोलीस स्थापना दिन साजरा करणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलीच घटना असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या उपक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हिरवी झेंडी दाखवली.
सलग ६३ किलोमीटर स्केटिंगराष्ट्रीय खेळाडू विनोद अहिरे यांनी ट्रॅकवरून पोलीस वसाहतीतील एक किलोमीटरच्या रोडवरुन सलग ६३ किलोमीटर स्केटिंग केले. महाराष्ट्र पोलीस सप्ताह दिनाचे जळगाव पोलीस दलाच्या वतीने आयोजन केले होते. यावेळी विनोद अहिरे या पोलीस दलात वीस वर्ष सेवा झालेल्या ४४ वर्षीय पोलीस जवानाने ६३ किलोमीटर स्केटिंग करून पोलीस स्थापना दिन साजरा केला. भारतातील पहिल्यांदाच एकाद्या जवानाने असा पोलीस सप्ताह दिन साजरा केल्याचा दावा विनोद अहिरे यांनी केला आहे. या पुर्वीही विनोद अहिरे यांनी ४० किलोमीटर स्केटिंग केले होते. विनोद अहिरे हे कराटे, आईस हॉकी, जलतरणाचे राष्ट्रीय खेळाळू आहेत. २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला ६३ वर्षे पूर्ण झाली. २ जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल पोलीस सप्ताह म्हणून साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू हवालदार विनोद अहिरे यांनी पोलीस मुख्यालयातील रोडच्या ट्रॅकवर सलग 63 किलोमीटर स्केटिंग करण्याचा माणस व्यक्त केला होता. त्याला पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी संमती दिल्याने त्यांनी हा विक्रम केला. सदरचे 63 किलोमीटरचे अंतर त्यांनी दोन तास २६ मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केले.