महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी; हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

या वर्षी रब्बीचे क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्‍टरवर खरीप हंगामात पेरणी होते. त्यातील जवळपास सव्वा ते दीड लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामाचो पेरणी होते. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने रब्बीच्या पेरणीत 50 ते 75 हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्यता आहे.

rabbi crop session
अडीच लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी

By

Published : Nov 4, 2020, 7:11 PM IST

जळगाव- जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी, कूपनलिका तसेच इतर स्त्रोतांना भरपूर पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, मका, दादर या पिकांची पेरणी होते. जिल्ह्यात यावर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

अडीच लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी

जळगाव जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात वार्षिक सरासरीच्या 140 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, नद्या तसेच इतर स्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. या वर्षी रब्बीचे क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्‍टरवर खरीप हंगामात पेरणी होते. त्यातील जवळपास सव्वा ते दीड लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामाचो पेरणी होते. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने रब्बीच्या पेरणीत 50 ते 75 हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्रफळ सव्वादोन ते अडीच लाख हेक्टर असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

असे आहे कृषी विभागाचे नियोजन-

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने योग्य पद्धतीने नियोजन केल्याची माहिती जळगाव कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. भोकरे पुढे म्हणाले की, रब्बी हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना हरभरा, मका बियाणे पुरवण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन वर्ग देखील घेण्यात आले आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा खताचा तुटवडा भासू नये, यासाठी आवश्यक त्या खतांचा बफर स्टॉक ठेवण्यात आलेला आहे. रब्बी हंगामात बहुतांश शेतकरी युरिया खताचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे युरियाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यावर कृषी विभागाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

अडीच लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी
खरीप हंगाम वाया गेल्याने आता रब्बीवर आशा-जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला. खरीप हंगामात कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे उडीद, मूग या कडधान्य पिकांसह कापूस, मका, ज्वारी, बाजरी यासारख्या नगदी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. पाणी उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत.

जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीला सुरुवात-

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा त्याचप्रमाणे जळगाव तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. याशिवाय तापी नदीच्या पट्ट्यातील चोपडा, यावल, रावेर तसेच भुसावळ तालुक्यातील काही भागात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details