महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या सामूहिक हत्याकांडाने जिल्हा हादरला

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरातील संघटीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. खरात कुटुंबीयांवर टोळी युद्धातूनच हल्ला झाला आहे. त्यात रवींद्र खरातांसह त्यांचे बंधू सुनील खरात, मुले प्रेमसागर खरात, रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात आणि सुमित गजरे यांचा बळी गेला.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या सामूहिक हत्याकांडाने जिल्हा हादरला

By

Published : Oct 8, 2019, 4:32 PM IST

Updated : Oct 8, 2019, 5:51 PM IST

जळगाव- विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भुसावळात भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या यांच्यासह पाच जणांचे सामूहिक हत्याकांड घडले. यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या हत्याकांडामुळे खरात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रथमदर्शनी हे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याचे दिसत असले तरी त्यामागे राजकीय कंगोरे असण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या सामूहिक हत्याकांडाने जिल्हा हादरला

हेही वाचा-उमेदवारी मागे घ्या; समरजितराजेंच्या आईंना धमकीचे फोन

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरातील संघटीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. खरात कुटुंबीयांवर टोळी युद्धातूनच हल्ला झाला आहे. त्यात रवींद्र खरातांसह त्यांचे बंधू सुनील खरात, मुले प्रेमसागर खरात, रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात आणि सुमित गजरे यांचा बळी गेला. या हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या खरात यांच्या कुटुंबीयांना घटनेची आपबीती सांगताना अश्रू अनावर झाले होते. मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे सशस्त्र हल्ला चढवत खरात यांच्यासह पाचही जणांना ठार केले. सुदैवाने आम्ही बचावलो. या प्रकरणामागे बड्या राजकीय लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड घडणं अशक्य आहे, असं सांगत त्यांनी आम्हाला न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा-उमेदवारी मागे घ्या; समरजितराजेंच्या आईंना धमकीचे फोन

भुसावळात घडलेल्या सामूहिक हत्याकांडाच्या घटनेनंतर खरात कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सोमवारी सायंकाळी भुसावळात आलेले होते. 'सूडाच्या भावनेतून ही घटना घडली असून त्यामागे बड्या राजकीय लोकांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे,' असे मत यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दरम्यान, या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. परंतु, पोलीस अद्याप घटनेच्या मूळ कारणापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. अटकेत असलेल्या तिघा संशयित आरोपींनी दिलेल्या जबाबाभोवतीच पोलीस तपास फिरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात तिन्ही संशयितांना सुपारी देऊन हे हत्याकांड घडवण्यात आले आहे. अशीही चर्चा भुसावळात दबक्या आवाजात सुरू आहे. या हत्याकांडाच्या घटनेनंतर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भुसावळ शहरात गोळीबार, प्राणघातक हल्ला, खून अशा घटनांचा आलेख कमी होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Last Updated : Oct 8, 2019, 5:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details