जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव शहरात ( Physical abuse case in Jalgaon ) एका भागात राहणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ६२ वर्षीय वृध्दाला अटक करण्यात आली होती. या संशयित आरोपीला आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. चंदुलाल मराठे असे संशयित आरोपीचे ( Chandulal Marathe in abuse case ) नाव आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ( Jalgaon Shivsena woman leaders ) संशयित आरोपीला काळे फासून चोप देण्याचा न्यायालयात प्रयत्न केल्याची घटना जळगाव जिल्हा न्यायालयाच्या परिसरात घडली आहे. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून माहिला पदाधिकाऱ्यांपासून संशयित आरोपीला पोलीस संरक्षण दिले. आरोपीची पुढील कारवाईसाठी ( Police protection to accused at court ) रवानगी केली. पोलीस संरक्षणात संशयिताला घेऊन जात असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस वाहनाचा पाठलाग केला. या प्रकारामुळे जिल्हा न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
काय घडली होती घटना
धरणगाव शहरातील एका भागात संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय - ६२) याची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. त्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे याने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. पीडीत मुलीच्या आई व वडीलांना धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदुलाल मराठे याच्यावर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.