महाराष्ट्र

maharashtra

लग्नसाेहळे ५० वऱ्हाडींत उरका, अन्यथा जिल्‍ह्यात पुन्हा 'लॉकडाऊन'; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

By

Published : Feb 18, 2021, 4:33 PM IST

Published : Feb 18, 2021, 4:33 PM IST

जळगाव
जळगाव

जळगाव- जिल्ह्यात काेराेनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांची कठाेर अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले. त्यात लग्न साेहळ्यांसाठी ५० जणांची मर्यादा घातली. मास्क न वापरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारा, गर्दी टाळण्यासाठी उद्याने सकाळी ५ ते ९ या वेळेतच खुली ठेवा, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

जळगाव

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे आदेश काढले. विशेष कोविड रुग्णालय, कोविड काळजी केंद्रांची तपासणी करण्यात यावी. या रुग्णालयांची तपासणी करून त्यात आवश्यक साहित्य कोणत्याही क्षणी वापरता येतील, अशा स्थितीत ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्याधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे. शहरातील हाॅटेल, मंगल कार्यालये, सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांत हाेणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणाची माहिती प्रशासनाकडे देता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त असेल. मिळालेल्या माहितीनंतर प्रशासनाचे पथक तेथे जावून कारवाई करेल.

मास्क नाही तर प्रवेश नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. जे नागरीक मास्क वापरणार नाहीत, त्यांच्‍यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस विभागास दिले.

गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन

नागरिकांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, महापालिका, नगरपालिका, पोलीस विभागाने गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देताना 100 व्यक्तींची मर्यादा ठरवून द्यावी, अन्यथा अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये. परवानगी दिलेल्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. विना मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details