महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 12, 2021, 8:48 PM IST

Updated : Mar 13, 2021, 11:52 AM IST

ETV Bharat / state

खान्देशातील सुपुत्राचा साहित्य अकादमीकडून सन्मान; तहसीलदार आबा महाजन यांच्या लघुकथा संग्रहाला बालसाहित्य पुरस्कार!

साहित्य अकादमीच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात आबा महाजन यांच्या 'आबाची गोष्ट' या लघुकथा संग्रहाला 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर झाला. 50 हजार रुपये रोख आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य विश्वात हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.

aaba mahajan
आबा महाजन

जळगाव -खान्देशाचे सुपूत्र तथा नव्या पिढीतील प्रसिद्ध प्रयोगशील बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या 'आबाची गोष्ट' या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. आबा महाजन हे महसूल विभागात तहसीलदार असून ते सध्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे सेवारत आहेत. महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी आहेत. त्यांच्या रुपाने प्रथमच खान्देशातील व्यक्तीला साहित्य अकादमीचा सन्मान मिळाला आहे.

बालसाहित्यिक आबा महाजन याबाबत प्रतिक्रिया देताना.

असे आहे पुरस्काराचे स्वरूप -

साहित्य अकादमीच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात आबा महाजन यांच्या 'आबाची गोष्ट' या लघुकथा संग्रहाला 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर झाला. 50 हजार रुपये रोख आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य विश्वात हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. आज सायंकाळी साहित्य अकादमीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाजन यांनाही पुरस्कार जाहीर झाला. ही बातमी कळताच आबा महाजन यांच्यावर त्यांच्या हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

'आबाची गोष्ट' लघुकथा संग्रह.

हेही वाचा -जळगाव : बाजार समितीने बंदची कल्पना न दिल्याने फेकावा लागला शेकडो क्विंटल भाजीपाला

2017 मध्ये प्रकाशित झाला आहे लघुकथा संग्रह -

आबा महाजन यांचा 'आबाची गोष्ट' हा लघुकथा संग्रह 2017मध्ये प्रकाशित झाला आहे. दिलीपराज प्रकाशनच्या वतीने हा लघुकथा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. आबा महाजन हे नव्या पिढीतील प्रयोगशील बालसाहित्यिक मानले जातात. आत्तापर्यंत 13 बाल कवितासंग्रह, 2 बालकुमार कथासंग्रह, 2 बालकुमार कादंबरी, बालनाट्य, मुलांसाठी ललित, 10 पोस्टर कविता, फ्रेम कविता अशी साहित्यसंपदा त्यांच्या नावे आहे. त्यांच्या बाल साहित्यावर 3 संपादित पुस्तकेदेखील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कथा व कवितांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना 3 मानाचे पुरस्कारही यापूर्वी जाहीर झाले आहेत. याशिवाय विविध संस्थांच्या वतीने त्यांना साहित्यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा -जळगावात जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद; बाजारपेठ 'शटर डाऊन'विशेष: जळगाव जिल्ह्यातील 34 ड्रायव्हिंग स्कूल्स 'आरटीओ' विभागाच्या रडारवर

पुरस्कार केला बालमित्रांना समर्पित -

साहित्य अकादमीच्या वतीने प्रतिष्ठेचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आबा महाजन यांनी हा पुरस्कार आपल्या बालमित्रांना तसेच खानदेशातील बोलीला समर्पित केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपल्या बालसाहित्याच्या साधनेची दखल साहित्य अकादमीने घेतली, याचा मनस्वी आनंद असल्याची भावना महाजन यांनी व्यक्त केली. बालसाहित्यात आजवर आपण अनेक प्रयोग केले. 'आबाची गोष्ट' या लघुकथा संग्रहात निम्म्याहून अधिक कथा या माझ्या बालपणातील घटनांची निगडीत आहेत. त्याचप्रमाणे खानदेशातील अनेक संदर्भ या कथांमध्ये आहेत, असे त्यांनी या लघुकथा संग्रहाबद्दल बोलताना सांगितले.

हेही वाचा -विशेष: जळगाव जिल्ह्यातील 34 ड्रायव्हिंग स्कूल्स 'आरटीओ' विभागाच्या रडारवर

Last Updated : Mar 13, 2021, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details