जळगाव -नागपूर येथील आरएसएसच्या कार्यलयावर जैश ये मोहम्मद संघटनेने रेकी केली असून अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून त्यातूनच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीष महाजन यांनी दिली आहे
नागपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर जैश ये मोहम्मदद संघटनेने रेकी केली असून याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे कलम 370 नंतर अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून यातूनच हा प्रकार झाल्याची प्रतिक्रिया गिरीष महाजन यांनी दिली आहे.तसेच पंजाब येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबतही काँग्रेसवर या वेळी भाजप नेते गिरीष महाजन यांनी निशाणा साधला आहे.
आरएसएस मुख्यालयाची रेकी.. कलम 370 हटवल्याने दहशतवादी संघटनांचे धाबे दणाणले, त्यातूनच हा प्रकार - गिरीश महाजन
नागपूर येथील आरएसएसच्या कार्यलयावर जैश ये मोहम्मद संघटनेने रेकी केली असून अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून त्यातूनच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीष महाजन यांनी दिली आहे
काश्मीरी तरुणाला अटक -
जम्मू-काश्मीरमध्ये एका तरुणाला सेंट्रल एजन्सीला त्याच्याकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नागपुरात रेकी झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील एका तरुण हा नागपुरात आला होता. जुलै 2021 मध्ये नागपुरात दोन दिवस वास्तव्यास राहिला. याकाळात काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून नागपूर पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर सर्व माहिती नागपूर पोलिसांनाही देण्यात आली आहे. यात पाकिस्तानीच्या सांगण्यावरूनच तरुणाने नागपुरात रेकी केली असल्याचे समोर येत आहे. यामुळे या अनुषंगाने केंद्रीय समितीकडून चौकशी सुरू आहे.