महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न

फत्तेपूर येथे वेळेची मर्यादा संपल्यानंतर बाजारातील दुकाने सुरू होती. हा बाजार हटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्डचे काही कर्मचारी गेले होते. यामुळे गोंधळ होऊन गर्दी जमा झाली. या गोंधळातच पोलिसांना मारहाण झाली.

पोलिसांवर हल्ला
attack on police

By

Published : May 25, 2021, 12:08 PM IST

Updated : May 25, 2021, 1:55 PM IST

जळगाव -कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध सुरू आहे. यात किराणा माल, फळे व भाजीपाला विक्रीसाठी सकाळी 7 ते 11 वाजेची वेळ दिली आहे. मात्र, या वेळेनंतरही सुरु असलेला बाजार हटविण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केली. एकाने तर पोलिसाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे घडली आहे.

फळ विक्रेत्यांकडून पोलिसांवर हल्ला

पोलिसांनी बाजाराला विरोध करताच झाला गोंधळ
फत्तेपूर येथे वेळेची मर्यादा संपल्यानंतर बाजारातील दुकाने सुरू होती. हा बाजार हटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्डचे काही कर्मचारी गेले होते. त्यावेळी युसूफ शब्बीर खाँ पठाण, अश्रद युसूफ पठाण, महेमुद शब्बीर खाँ पठाण, इजाज महेमुद पठाण व मोहसीन महेमूद पठाण (रा. फत्तेपूर) यांनी पोलिसांना विरोध केला. यामुळे गोंधळ होऊन गर्दी जमा झाली. या गोंधळातच पोलिसांना मारहाण झाली. तसेच सुरवाडे यांच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एकास अटक, चौघे फरार
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तणाव निवळला. या प्रकरणी पो. कॉ. अनिल सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध पहूर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अश्रद पठाण याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार जण फरार झाले आहेत.

Last Updated : May 25, 2021, 1:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details