जळगाव -तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी पहिली विशेष सभा १२ व १७ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी तहसीलदारांनी गावनिहाय कार्यक्रम जाहीर केला. प्रतिस्पर्धी पॅनलमधील सदस्य फोडाफोडी, सदस्यांची जुळवाजुळव व सहलीवर गेलेले ग्रामपंचायत सदस्य यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली आहे.
ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यासाठी पहिली विशेष सभा घेण्यासाठी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सर्व नियुक्त अध्यासी अधिकारी, संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांचे तहसील कार्यालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सरपंच व उपसरपंच निवड झाल्यानंतर निवडून आलेल्यांचा नावांचा अहवाल इतिवृत्ताच्या चार प्रती सादर कराव्यात, असे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे. प्रतिस्पर्धी पॅनलमधील उमेदवार फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर अनेक गावांमधील ग्रामपंचायत सदस्यांचे पॅनल सहलीवर गेलेले आहे. सरपंच, उपसरपंच निवडीच्या दिवशीच ते गावांमध्ये पोहोचणार आहेत. काही गावांमध्ये सदस्यांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे या रंगत निर्माण झालेली आहे.
१५ फेब्रुवारीला या २४ ग्रामपंचायतींमध्ये होणार निवड -
शिरसोली प्र.बो.(नामाप्र), म्हसावद (अनुसूचित जाती), आसोदा (अनुसूचित जमाती महिला), आवार (अनुसूचित जमाती), कानळदा (सर्वसाधारण), कुसुंबा खुर्द (सर्वसाधारण महिला), भादली बुद्रुक (नामाप्र), फुपनगरी (सर्वसाधारण महिला), धानवड (अनुसूचित जमाती), भोकर (सर्वसाधारण महिला), बोरनार (नामाप्र महिला), नांद्रा बुद्रुक (नामाप्र महिला), सावखेडा बुद्रुक (सर्वसाधारण), मोहाडी (नामाप्र), रायपूर (अनुसूचित जाती महिला), जळगाव खुर्द (सर्वसाधारण), फुपणी (अनुसूचित जमाती महिला), वडली (अनुसूचित जमाती), वावडदा (अनुसूचित जाती), शेळगाव-कानसवाडे (अनुसूचित जमाती), मन्यारखेडा (सर्वसाधारण महिला), रिधूर (अनुसूचित जमाती महिला), गाढोदा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), नांद्रा खुर्द-खापरखेडा (सर्वसाधारण महिला).
१७ फेब्रुवारीला या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड -
शिरसोली प्र.न. (अनुसूचित जमाती), ममुराबाद (नामाप्र), तुरखेडा (सर्वसाधारण महिला), वडनगरी (सर्वसाधारण), उमाळे-देव्हारी (नामाप्र महिला), आव्हाणे (नामाप्र महिला), कंडारी (नामाप्र महिला), कठोरा (सर्वसाधारण महिला), लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे (नामाप्र महिला), पिलखेडा (अनुसूचित जमाती), दापोरा (सर्वसाधारण), धानोरा बुद्रुक-नागझिरी (सर्वसाधारण), चिंचोली (नामाप्र), जवखेडे (आज ९ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या आरक्षण सोडतीनुसार आरक्षण ), रामदेववाडी (नामाप्र महिला), कडगाव (सर्वसाधारण महिला), तरसोद (अनुसूचित जाती), डिकसाई (सर्वसाधारण).