जळगाव -माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत मंजूर केली आहे. याबाबतची माहिती स्वतः खडसेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भोसरीतील एका भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंना नोटीस बजावली होती. त्यानुसार, खडसेंना आज (30 रोजी) चौकशीला हजर रहावे लागणार होते. परंतु, कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने खडसेंनी वेळ मागून घेतला आहे.
एकनाथ खडसेंची १४ दिवसानंतर होणार 'ईडी'कडून चौकशी
माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत मंजूर केली आहे. ईडीच्या नोटिसीनुसार खडसेंना आज (30 रोजी) चौकशीला हजर रहावे लागणार होते. परंतु, कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने खडसेंनी वेळ मागून घेतला आहे.
एकनाथ खडसे यांना भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी चौकशीसाठी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) नोटीस बजावली आहे. त्यांना आज हजर राहण्याचे कळवण्यात आले होते. मात्र, खडसे यांनी हजर न राहता, चौकशीसाठी मुदत मागितली होती. त्याबाबत यांनी ‘ईडी’ला पत्रही दिले होते. त्यानुसार त्यांना ईडीने मुदत मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक माध्यमांना दिले आहे.
भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचे आहे प्रकरण-
एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ‘ईडी’ने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग तसेच झोटिंग समितीने चौकशी केली होती. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आज त्यांची चौकशी करण्यात येणार होती. या चौकशीसाठी ते जळगाव येथून मुंबई येथे आले आहेत. मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी ते आहेत. त्यांच्या समवेत पत्नी मदांकिनी खडसे व कन्या अॅड. रोहिणी खडसे आहेत.