महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात दरराेज २ हजारांवर चाचण्या; ‘काेराेनामुक्ती’चा रेट ६९ टक्क्यांवर

मे अखेरला जिल्ह्यात दैनंदिन २०० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु, आता गेल्या दोन महिन्यांत तपासणीची साधने वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. सद्य:स्थितीमध्ये दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात ११ व्या स्थानी पोहोचला असून, जिल्ह्यात ७ ऑगस्टला १९११ तर ८ ऑगस्टला २०७२ अशा एकूण ३९८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Jalgaon latets corona updates
Jalgaon latets corona updates

By

Published : Aug 10, 2020, 1:51 PM IST

जळगाव - जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सुमारे २०७२ इतक्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ६३ हजार १४६ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांसाेबतच रुग्ण बरे हाेण्याचा दरही ६९ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. जिल्ह्यात ९ हजार ५८८ रुग्ण बरे झाले असून, सध्या केवळ ३६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण दहापटीने वाढले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

मे अखेरला जिल्ह्यात दैनंदिन २०० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत होत्या; परंतु आता गेल्या दोन महिन्यांत तपासणीची साधने वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. सद्य:स्थितीमध्ये दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात ११ व्या स्थानी पोहोचला असून, जिल्ह्यात ७ ऑगस्टला १९११ तर ८ ऑगस्टला २०७२ अशा एकूण ३९८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या २३३७, तर आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या १६४५ इतकी आहे.

सध्या राज्यात दैनंदिन सर्वाधिक १२,४०२ चाचण्या नाशिक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन दोन हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून, त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्या केल्याने बाधित रुग्ण शोधण्यास मदत होत असून, कोरोनाची साखळी खंडित करण्यात मदत होणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

काेराेनाला घाबरू नका, जागरूक राहा : जिल्हाधिकारी

नागरिकांनी कोराेनाला घाबरू नये; परंतु जागरूक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरित आपल्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनिटायझरच्या वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details