महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले; नागपूर-सुरत महामार्गावरील घटना

नागपूर-सुरत महामार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील हिरापूर फाट्यावर आज सकाळी हा अपघात झाला.

ट्रकने दाम्पत्याला चिरडले; नागपूर-सुरत महामार्गावरील घटना

By

Published : Nov 17, 2019, 2:46 PM IST

Updated : Nov 17, 2019, 3:21 PM IST

जळगाव -नागपूर-सुरत महामार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात ट्रकखाली आल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील हिरापूर फाट्यावर आज सकाळी हा अपघात घडला.

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले; नागपूर-सुरत महामार्गावरील घटना

हेही वाचा - जळगाव पालिकेच्या महासभेत कचऱ्याच्या विषयावरून भाजप-सेनेत खडाजंगी

मधुकर महारु पाटील (वय 40) तसेच त्यांच्या पत्नी गोडबाई मधुकर पाटील (वय 36) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. पाटील दाम्पत्य जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. या घटनेमुळे शिरसोली गावावर एकच शोककळा पसरली आहे.

महामार्गाची झाली आहे दुर्दशा -

दरम्यान, धुळे-जळगाव महामार्गाची चाळण झालेली असून अनेक अपघात या महामार्गावर घडले आहेत. अनेक निष्पाप बळी गेले मात्र, महामार्ग अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना जाग येत नाही. खासदारांनी सात दिवसात रस्त्यावरील खड्डे डांबर आणि खडीने बुजवले जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 12 दिवस उलटले तरीही खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोकभावना तीव्र आहेत. या अपघातानंतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संतप्त लोकांनी केली. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संतप्त लोकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.

हेही वाचा - घोडे धुण्यासाठी नदीत उतरलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले

Last Updated : Nov 17, 2019, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details