जळगाव - जिल्ह्यात अद्याप कोरोना संसर्ग थांबण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी पुन्हा 36 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 907 इतकी झाली आहे.
जळगाव आणि भुसावळ या दोन्ही शहरात रुग्णसंख्येने द्विशतक गाठले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मृत्युदराची चौकशी करण्यासाठी 'डेथ ऑडिट' समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल गुरुवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यातील तब्बल 36 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जळगाव शहरात 7, भुसावळ 7, अमळनेर 4, भडगाव 1, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, जळगाव ग्रामीण 1, रावेर 5, पारोळा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत सर्वाधिक 206 कोरोनाबाधित रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहेत. त्यानंतर भुसावळमध्ये 205 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर अमळनेरमध्येही 143 कोरोनाबधित रुग्ण आढळलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एका माजी आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह संपर्कातील लोकांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
‘डेथ ऑडिट’ समिती स्थापन
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे. सध्या जिल्ह्यात 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या चौपट मृत्युदर जळगाव जिल्ह्यात असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘डेथ ऑडिट' समिती नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी डॉ. दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 5 डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. तसेच प्रभावी उपचारासाठी डॉ. सुनील चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 11 तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सचीही स्थापना केली आहे.
तालुकानिहाय रुग्ण
जळगाव - 206
भुसावळ - 205
अमळनेर - 143
जळगाव ग्रामीण - 28
चोपडा - 46