जळगाव- भाजप सरकार अतिशय असंवेदनशील आहे. त्यामुळेच राज्यभरात महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे. औरंगाबाद येथे एका मुलीवर घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एवढी विदारक परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना कोणतेही गांभीर्य नाही. ते महाजनादेश यात्रेत गुंग आहेत. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज जळगावात केली.
मुख्यमंत्री साहेब, आगामी विधानसभा निवडणुकीत महिलाच मतदानातून तुम्हाला जागा दाखवतील - चाकणकर
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना ते यात्रा-जत्रेत फिरण्यात व्यस्त आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या महिला तुम्हाला जागा दाखवतील. महिला सुरक्षेप्रश्नी आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या महाजनादेश यात्रेत धारेवर धरू, असा इशारा चाकणकरांनी मुख्यमंञ्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी त्या शनिवारी दुपारी प्रथमच जळगाव दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. चाकणकर पुढे म्हणाल्या की औरंगाबाद येथील एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली. मला काल या घटनेविषयी माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करून घटनेविषयी माहिती दिली. पीडित मुलीला योग्य ते उपचार मिळावेत, आणि प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक व्हावी अशी मागणी मी त्या ट्वीटमध्ये केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी माझ्या ट्वीटची साधी दखलही घेतली नाही. उत्तर देणे ही बाब तर दूरच राहिली. औरंगाबादची घटना अंगावर शहारे आणणारी आहे. पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत पीडित मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला चांगल्या उपचारांची गरज असताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे घटनेकडे दुर्लक्ष आहे. डिजिटल इंडियाच्या घोषणा करणाऱ्या भाजप सरकारच्या काळात एवढी मोठी घटना घडून देखील पोलीस अद्याप कागदीघोडे नाचवत आहेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
चाकणकर पुढे म्हणाल्या, आज भाजपची मेगा भरती सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे पक्ष संघटन उत्तम आहे. अशाच प्रकारे आपल्याला पक्ष संघटन मजबूत ठेवायचे आहे. चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला तरीही आपली एकही महिला पदाधिकारी त्यांच्याकडे समजूत घालण्यासाठी गेली नाही, यावरून आपली पक्षानिष्ठा लक्षात येते यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या सुरू आहे. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना ते यात्रा-जत्रेत फिरण्यात व्यस्त आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या महिला तुम्हाला जागा दाखवतील. महिला सुरक्षेप्रश्नी आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या महाजनादेश यात्रेत धारेवर धरू, असा इशारा देखील चाकणकर यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या सुरू आहे. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना ते यात्रा-जत्रेत फिरण्यात व्यस्त आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या महिला तुम्हाला जागा दाखवतील. महिला सुरक्षेप्रश्नी आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या महाजनादेश यात्रेत धारेवर धरू, असा इशारा देखील चाकणकर यांनी यावेळी दिला.