महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : किनगाव अपघात प्रकरणी ट्रकचालकासह व्यापाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दोघांना अटक

आज मध्यरात्रीच्या सुमारास पपई भरून धुळ्याहुन रावेरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी झाली. या भीषण अपघातात 13 मजुरांसह 2 बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. ही घटना तालुक्यातील किनगाव गावाजवळ अंक्लेश्वर-बुऱ्हाणपुर राज्य मार्गावर घडली.

yawal police station
यावल पोलीस ठाणे

By

Published : Feb 15, 2021, 4:59 PM IST

Updated : Feb 15, 2021, 7:39 PM IST

जळगाव -यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ झालेल्या अपघातात 13 मजूरांसह 2 बालकांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी ट्रकचालकासह पपई व्यापारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे.

मृताच्या नातेवाईंकाच्या प्रतिक्रिया.
पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी घटनास्थळी दिली भेट -

आज मध्यरात्रीच्या सुमारास पपई भरून धुळ्याहुन रावेरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी झाली. या भीषण अपघातात 13 मजुरांसह 2 बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. ही घटना यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ अंक्लेश्वर-बुऱ्हाणपुर राज्य मार्गावर घडली. या पार्श्वभुमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी घटनेचे वृत्त कळताच तत्काळ दुपार २ वाजेच्या सुमारास किनगाव येथे घटनास्थळी भेट दिली आणि अपघात स्थळाची पाहणी केली.

हेही वाचा -जळगाव अपघात : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेले गरिबांचे बळी; भाजपाच्या अनिल चौधरींचा आरोप

दोघांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल -

दरम्यान, यावल येथे पोलीस ठाण्याला भेट देवुन अपघाता संदर्भातील माहिती घेवुन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना घटने संदर्भातील काही सूचना दिल्या. माध्यमांशी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी सांगितले की, या अपघातातील जबाबदार आयशर चालक शेख जहीर शेख बदरूद्दीन (रा. रावेर) व पपई व्यापारी अमीन शाह अशपाक शाह (रा. केऱ्हाळा, ता. रावेर) या दोघांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रकचालक व व्यापारी या दोघांना अटक करण्यात आली आहे, असेही दिघावकर यांनी सांगितले.

Last Updated : Feb 15, 2021, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details