जळगाव -तालुक्यातील शिरसोली गावाच्या शिवारात असलेल्या जंगलात आज (बुधवारी) रात्री 10 वाजेनंतर अचानक वणवा पेटला. त्यामुळे सुमारे दोन किलोमीटरपर्यंतचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी शिरसोली, मोहाडी गावातील ग्रामस्थांसह जळगाव महापालिका, जैन इरिगेशन कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या परिसरातील जंगलात आज रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन बंबांसह शिरसोली व मोहाडी येथील ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.