महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ncp Melawa In Bhusawal : भाजपला फटका; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अनेकांचा प्रवेश

जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र काही जणांना सोन्याची किंमत कळली नाही. मात्र राष्ट्रवादीला ती कळली असल्याचे सांगत एकनाथ खडसे (Eknath Khadse Enters in NCP) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अजित पवार यांनी समर्थन केले आहे.

Ncp Melawa In bhusawal
Ncp Melawa In bhusawal

By

Published : Dec 18, 2021, 9:07 AM IST

Updated : Dec 18, 2021, 9:28 AM IST

जळगाव -जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र काही जणांना सोन्याची किंमत कळली नाही. मात्र, राष्ट्रवादीला ती कळली असल्याचे सांगत एकनाथ खडसे (Eknath Khadse Enters in NCP) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अजित पवार यांनी समर्थन केले आहे. खडसे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने जळगाव जिल्हा हा मागील काळाप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होण्यास वेळ लागणार नसल्याचे ही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील राष्ट्रवादी पक्षाचे मेळाव्याप्रसंगी अजित पवार बोलत होते.

राष्ट्रवादीत अनेकांचा प्रवेश
'खडसेंनी ज्या पक्षाला लहानाचे मोठे केले. त्याच पक्षाने त्यांचा अपमान केला. त्यांच्यावर खोटे नाटे आरोप लावले आहेत. ज्यांनी त्या पक्षाला मोठे केले त्याच एकनाथ खडसे यांना त्यांचा पक्ष झाला नाही तो आपल्याला काय होणार अशी सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये भावना आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यांना गुणवत्तेनुसार न्याय देण्याचा प्रयत्न असेल. एकनाथ खडसे हे अन्य पक्षात असताना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कोणतीही परिस्थिती ही कायम नसते. चार दिवस सासूचे असतात तसेच ते सूनेचीही असतात हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीत पक्षात उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली आहे,' असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

खडसे हे निवडणूकीपूर्वी पाहिजे होते

खडसे हे निवडणुकीपूर्वीच पाहिजे होते. तर राष्ट्रवादीचे चित्र आणखी वेगळे दिसले असते. मात्र, आता जे झालं ते झाल कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने अनेक काम बाकी राहिली होती. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज पूर्ण भरले आहे त्यांना मदत देणे राहिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ही अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत खडसे समर्थक राहिलेल्या भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा -Shivsena Agitation Kolhapur : कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कोल्हापुरात पडसाद

Last Updated : Dec 18, 2021, 9:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details