हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 53 वर पोहोचलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी कायम राहणार आहे. आता एक दिवसाआड सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत भाजीपाला विक्री केंद्रे सुरू ठेवता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
हिंगोलीत लॉकडाऊन कायम, एक दिवसाआड होणार भाजीपाला विक्री
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आता १७ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार हिंगोलीमध्ये देखील १७ मेपर्यंत संचारबंदी आणि सीमाबंदी राहणार आहे. मात्र, अत्यावश्कय सोयी-सुविधांसाठी सूट देण्यात आली आहे.
कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आता १७ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार हिंगोलीमध्ये देखील १७ मेपर्यंत संचारबंदी आणि सीमाबंदी राहणार आहे. मात्र, अत्यावश्कय सोयी-सुविधांसाठी सूट देण्यात आली आहे. यामध्ये परवानाधारक भाजीपाला विक्रेते, किराणा दुकान, इलेक्ट्रॉनिक, कृषी सेवा केंद्र, स्टेशनरी, मटण-चिकन, स्वीट मार्ट, दूध विक्री केंद्रे, बेकरी हे सर्व दुकाने एक दिवसाआड सुरू राहणार आहे. मात्र, दारूविक्रीचे आदेश अद्यापही निघाले नाहीत. सायंकाळपर्यंत दारू विक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
भाजीपाला केंद्र उभारलेल्या ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ६, ८, १०, १२, १४ आणि १ मे रोजी दुकानांना शिथिलता दिली जाणार आहे. तसेच स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक दुकानात येणाऱ्या ग्राहकांची व कामगारांची देखील नोंद, मोबाईल क्रमांक घेणे बंधनकारक आहे. मुख्य म्हणजे दुकानात सॅनिटाइझर आणि हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासह दोन ग्राहकातील अंतर हे एक मीटर राहील याची दक्षता घेणे बंधनकारक आहे.