महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीच्या हट्टा परिसरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ - wasmat

हट्टा परिसरात कॅनॉल मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

unidentified-persons-dead-body-found-at-hatta-in-hingoli
हिंगोलीच्या हट्टा परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

By

Published : Apr 6, 2020, 2:09 PM IST

हिंगोली- वसमत तालुक्यातील येथील हट्टा परिसरात कॅनॉलमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरिक्षक मोरे यांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. वसमत येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या परिसरात जागोजागी रस्ते बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या भागात एका तरुणाचा मृतदेह कनॉल मध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हट्टा पोलीस सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेमका हा मृतदेह कोणाचा आहे, याची अद्याप तरी ओळख पटलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details