महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत वीज पडून एक महिला अन् मुलीसह वृद्धाचा मृत्यू - Raing

विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावल्याने शेतात काम करणाऱ्या महिलांनी झाडाखाली धाव घेतली. मात्र, त्याच झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

मृत

By

Published : Jul 19, 2019, 10:52 PM IST

Updated : Jul 20, 2019, 12:04 AM IST

हिंगोली- वसमत तालुक्यातील अकोली- खांडेगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज अंगावर पडून एक महिला एक मुलगी आणि एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजता घडली.

बाबाराव गंगारम चव्हाण (वय 65, रा. गुंडा), गयाबाई प्रकाश काकडे (वय 48), लोचना नारायण काकडे (वय 16) अशी मृतांची नावे आहेत. जिल्ह्यात पावसाने मागील काही दिवसांपासून उघडीप घेतल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता. पावसाचा नसल्याने शेतीची कामे सुरू होती.

नातेवाईकांचा आक्रोश

या घटनेत मृत झालेल्या महिला शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी महिलांनी झाडाखाली धाव घेतली. त्या झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी आणि वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तिघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही. मृतांचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश करत होते.

Last Updated : Jul 20, 2019, 12:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details