हिंगोली -एकीकडे भविष्याचा प्रश्न तर दुसरीकडे भावाच्या मृत्यू बद्दल मनात संशयाचे काहूर.. यातून स्वत:ला सावरत गंगा नावाच्या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीचा पेपर सोडवण्यासाठी परीक्षा केंद्र गाठले. तिच्या नातेवाईकांनीही तिला भावाचा मृत्यू झाल्याची जराही जाणीव होऊ दिली नाही. मात्र, घरातील हालचाली तिला संशयास्पद वाटू लागल्या. तोपर्यंत पेपरची वेळ झाली होती. अन गंगा पेपरला पोहोचली. ती घरी येईपर्यंत भावाचा मृदेह घरात ठेवण्यात आला होता.
गौरव अनिल खंदारे या 14 वर्षीय मुलाचा आज पहाटे डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. ज्याच्या सोबत लहान पानापासून खेळले बागडले, तोच भाऊ आज अचानक पणे सोडून गेला. मात्र, पुढे भविष्य होते. त्यामुळे स्वतःच्या काळजावर दगड ठेवून गंगा परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिच्यासोबत तिचे नातेवाईक होते. आज मात्र रोज सोबत येणारे वडील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे गंगाला दुःख तर होते. मात्र, वडिलांनी ही गंगाला काहीच समजू नये म्हणून हुंदके दाबत परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक दिला आणि पेपर चांगला सोडविण्याचे ही सांगितले. गंगा ही आपल्या वडिलांच्या आदेशाचे पालन करत आपल्या नातेवाईकांसोबत पेपरला पोहोचली.