महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नगरी सज्ज; देशभरातील भाविक घेणार नागनाथाचे दर्शन

महाशिवरात्री निमीत्त औंढा नगरी तयारी पूर्ण झाली आहे. भावीकांनी उत्सवाचा जास्तीतजास्त लाभा घेण्याचे आवाहन नागनाथ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

By

Published : Feb 20, 2020, 7:11 PM IST

preparations-were-completed-at-mahashivratri-in-aundha-nagnath
महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नगरी सज्ज; देशभरातील भाविक घेणार नागनाथाचे दर्शन

हिंगोली -शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र या विवाहाच्या दिवशी आणि या पर्व कालामध्ये महाशिवरात्रीचे जेवढे काही उत्सव असतात ते विवाहाच्या निमित्ताने पार पाडले जातात. त्यानुसार 12 ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे नागनाथ मंदिरात तयारी करण्यात आली आहे. परराज्यातुन दाखल होणाऱ्या भाविकांना नागनाथाचे दर्शन अतीशय शांततेत घेता यावे म्हणून लांबलचक दर्शन रांग उभारण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे ही बसवण्यात आलेले आहेत.

महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नगरी सज्ज; देशभरातील भाविक घेणार नागनाथाचे दर्शन

महाशिवरात्री म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ येथे गेल्या अनेक वर्षांपासून यात्रा भरते, या यात्रा महोत्सवात देशभरातील विविध भागातून भाविक दाखल होतात. त्यानुसार नागनाथ संस्थांनच्या वतीने या महोत्सवाची तयारी केली जाते. मंदिर परिसरात करण्यात आलेली रंगरंगोटी, आकर्षक रोषणाई यासह मंदिर सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच याठीकाणी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. हा महोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी भाविकांना आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

असे आहेत नागनाथ मंदिरातील अध्यात्मिक कार्यक्रम -

21 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी नागनाथाच्या मंदिरा मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पदसिद्ध सलागार मंडळाचे संतोष बांगर, अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यासह विश्वस्तांच्या हस्ते श्री चा अभिषेक होईल. त्यानंतर रात्री 12 वाजता शासकीय पूजा आणि पहाटे 2 वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करून दिले जाईल. दर्शन रांगेत उभे असलेल्या प्रथम भाविकाला शासकीय पूजेस बसण्याचा मान दिला जातो. हा मान आपल्याला मिळावा म्हणून अनेक भाविक आदल्या दिवशी पासून दर्शन रांगेत लागतात. दर्शन रांग सुरू झाल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत अभिषेक सुरू राहतात. साडेबारा वाजता जेव्हा हा काळ निश्चित होतो तेव्हाच हा महाशिवरात्रीचा कार्यकाळ पूर्ण होतो. त्याच प्रमाणे ज्या भाविकांचा नवस पूर्ण होतो असे भाविक या ठिकाणी नवस फेडत असतात. तिसऱ्या दिवशी रथोत्सवाने या उत्सवाची सांगता केली जाते. मंदिराला रात्री साडेदहा वाजता नागनाथ मंदिराला रथाच्या पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. या उत्सवाचा जास्तीतजास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन नागनाथ संस्थांनच्या वतीने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details