हिंगोली - जिल्ह्यात दारूविक्री ठरवून दिलेल्या वेळेत आणि नियमित होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, काही मद्यप्रेमींनी वसमत येथील हयातनगर फाटा येथे पहाटेपासून दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गर्दी झाली असल्याचे दिसून आले.
हिंगोलीत दारू खरेदीसाठी तळीरामांची गर्दी, पहाटेपासून लावल्या रांगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊनमुळे सर्वच दुकानासह दारू विक्रीची दुकाने बंद करण्यात आले होते. त्यामुळे मद्यप्रेमी दारूची दुकाने कधी उघडणार याची वाट पाहत होते. तब्बल पन्नास दिवसांनंतर इतर आस्थापनासह दारूविक्रीची ही दुकाने उघडली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊनमुळे सर्वच दुकानासह दारू विक्रीची दुकाने बंद करण्यात आले होते. त्यामुळे मद्यप्रेमी दारूची दुकाने कधी उघडणार याची वाट पाहत होते. तब्बल पन्नास दिवसांनंतर इतर आस्थापनासह दारूविक्रीची ही दुकाने उघडली आहेत. सध्या दारूविक्री सकाळी ८ ते दुारी १ यावेळेत सुरू आहे. त्यानुसार मद्यप्रेमी दारू घेण्यासाठी उन्हाची जराही पर्वा न करता दारू मिळवण्यासाठी रांगेत ताटकळत उभे आहेत. एवढेच नव्हे तर आपला नंबर कधी लागतोय या आशेपोटी दारू विक्रीच्या दुकानासमोर मद्यप्रेमींची चांगलीच झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले.
गर्दीमध्ये दारू विकणाऱ्याकडे परवाना नसला तरीही वेळ मारून नेत तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी दारू विक्रेता चांगलाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी गर्दी असली तरीही पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी दिसून आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित विभाग काय कारवाई करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.