हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात आणखी चार जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. नव्याने आढळणारे रुग्ण हे मुंबई येथून परतलेले आहेत. आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही 164 वर पोहोचली असून यातील 90 कोरोनाबाधित बरे झालेले आहेत, त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर 74 रुग्णांवर आता आयसोलोशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मुंबई रिटर्न असलेल्याना कोरोना झाल्याचे समोर येत आहे. ताज्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यातील एका 11 वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. या बालकाचे पालक मुंबईवरून हिंगोली तालुक्यात आलेले आहेत. तर वसमत तालुक्यातील हट्टा येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या 29 वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही व्यक्ती देखीलमुंबईवरूनच परतलेली आहे. तर आज रात्री हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार औंढा नागनाथ येथील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली आहे. एकंदरीतच एकाच दिवशी चार रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हिंगोली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती; परंतु सदर व्यक्तीचा हा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे नगरपालिकेसह मृत व्यक्ती वास्तव्यास असलेल्या भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
हिंगोलीत आणखी चार रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 164 वर
हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणखी चार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 164वर पोहोचली आहे. 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 74 रुग्णांवर आता आयसोलोशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
आज घडीला हिंगोली जिल्ह्यात 164 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 90 कोरोना रुग्ण हे बरे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात प्रशासनासह आरोग्य विभागाच्यावतीने सुट्टी देण्यात आलेली आहे.
तालुकानिहाय कोरोना रूग्ण -
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे, सध्या कळमनुरी येथील कोरोना सेंटरमध्ये 8 तर सेनगाव 12, हिंगोली येथील कोरोना सेंटरमध्ये 29 आणि वसमत येथील 14, औंढा येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृतीही स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे. तर राज्य राखीव दलाच्या एका कोरोनाबाधित जवानावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.