महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परीक्षा केंद्राबाहेरच खासगी शिकवणीच्या व्यवस्थापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

अमृतराव पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या खासगी शिकवणीच्या व्यवस्थापकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केला आहे. आरोपी विरोधात पोलिसात तक्रार नोद करण्यात आली आहे.

महाविद्यालय

By

Published : Feb 24, 2019, 2:16 PM IST

हिंगोली - खासगी शिकवणीच्या व्यवस्थापकाने बारावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना जिल्ह्यात घडली. विद्यार्थिनी इंग्रजीचा पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर येत असताना पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार घडला. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतराव पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (माळहिवरा) बारावीची परीक्षा सुरू आहे. या महाविद्यालयातून पीडित विद्यार्थिनी इंग्रजीचा पेपर सोडवून बाहेर येत होती. याच दरम्यान, तिच्या प्रतीक्षेत परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या खासगी शिकवणीच्या व्यवस्थापकाने तिच्याकडे धाव घेत पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच मुलीचा विनयभंग केला.

महाविद्यालय

यावेळी व्यवस्थापकाने 'तुझ्यावर माझे प्रेम आहे', असे सांगत तिला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडा-ओरडा करताच तिच्या वडिलांनी मुलीकडे धाव घेत विचारपूस केली. यानंतर वडिलांना सर्व प्रकार कळताच त्यांनी आणि तिथे उभ्या असणाऱ्या नागरिकांनी व्यवस्थापकाची चांगलीच धुलाई केली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


आरोपी व्यवस्थापकाने शिकवणी दरम्यान, विद्यार्थीनी सोबत ओळख वाढविली. तो तिच्यासोबत काही ना काही कारणाने बोलत होता. हा प्रकार वर्षभर सुरू होता. यानंतर त्यांने ओळखीचा फायदा घेत पीडितेचा अनेक वेळा विनयभंग केला. व्यवस्थापकाने या प्रकरणाची माहिती कुणाला सांगितली तर जीवे मारू, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे हा प्रकार विद्यार्थिनीने कुणाला सांगितला नाही. त्यानंतर व्यवस्थापकाचे चाळे सुरूच राहिले.

दरम्यान, शिकवणी वर्गाला सुट्ट्या लागल्याने तो तिला सतत फोन करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, विद्यार्थिनीने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोप तिला भेटण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहचला. यावेळी त्याने विद्यार्थिनीला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे म्हणत तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीने आरडा ओरड करताच तिच्या वडिलांनी धाव घेतली आणि आरोपीला पकडून चोप दिला.

हा सर्व प्रकार पोलिसांसमोरच घडला. यावेळी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना तुम्हाला गुन्हा दाखल करायचा का? असे विचारले. तेव्हा पीडितेच्या वडिलांनी होकार दिला. यानंतर पोलीस आरोपीला आपल्या दुचाकीवर बसवून पोलीस ठाण्याकडे निघाले. मात्र शहरापासून काही अंतरावरच जाताच मुलीकडील काही संतप्त नातेवाईकांनी पोलिसाची दुचाकी अडवून विनयभंग करणाऱ्याला आरोपीला चोपून काढले. यावेळी मुलीच्या नातेवाईकांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यामुळे पोलिसाने मारहाण करणाऱ्यांसह मुलीच्या वडिलांवर आणि इतर चौघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसाने पीडित मुलीच्या वडिलांसह इतरांवर गुन्हे दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. तर पीडितेचे नातेवाईक आरोपीला वाचविण्यासाठी पोलीस सहकार्य करत असल्याचा आरोप करत पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details