महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2021, 6:24 PM IST

ETV Bharat / state

हिंगोली : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड

दिवसेंदिवस हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सध्या लग्नसराईचा सिझन आहे, लग्न समारंभासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक जण अद्यापही परवानगी घेत नसल्याचे समोर आले आहे.

मंंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड
मंंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड

हिंगोली- दिवसेंदिवस हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सध्या लग्नसराईचा सिझन आहे, लग्न समारंभासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक जण अद्यापही परवानगी घेत नसल्याचे समोर आले आहे. कोरोना नियमांचे पालन न केल्याने जवळा-पळशी रोडवरील स्वप्नस्फूर्ती मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनास पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई असून, या कारवाईमुळे मंगल कार्यालय व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सध्या लग्नसराईचा सिझन आहे, लग्न समारंभासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक जण जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. लग्नाला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त गर्दी असते, सोशल डिस्टन्सिगचे पालन होत नाही. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालन्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मंगल कार्यालयांची तपासणी सुरू आहे. जवळा - पळशी रोडवरील स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाला जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट दिली असता, तेथे 50 पेक्षा जास्त लोक विवाह समारंभासाठी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते, त्यामुळे या मंगल कार्यालय व्यवस्थापनाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांमध्ये वाढ

जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. सध्या जिल्ह्यात 171 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सक्रिय झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details