हिंगोली -जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा वेग वाढला आहे. शनिवारी सकाळी फक्त एक तासाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे झेंडूची फुले हातची गेली. झेंडूला हिंगोलीतच नव्हे तर हैदराबादहूनही मोठ्याप्रमाणात मागणी असते. फुलांना मिळणारा भाव चांगला असतो. मात्र, भिजलेली फुले बाजारात नेणे म्हणजे अश्यक्यच असल्याने मिळेल त्या दरात फुले विकण्याची तर कधी फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येऊन ठेपली आहे.
हिंगोलीतील पावसाने झेंडूवर पाणी फेरले हेही वाचा - "क्योर"चक्री वादळाचा सिंधुदुर्गला जबरदस्त तडाखा, जनजीवन विस्कळीत
संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातुन वाहणारी कयाधु नदी दुथडी भरून वाहत होती. यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील दसरा अन् दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात झेंडूची लावगड केली होती. सुरुवातीला निसर्गाच्या कृपेने पीकाची वाढ चांगली झाली. झेंडूची फुले ही चांगल्याप्रकारे लगडली होती. यंदा झेंडूला चांगला भाव मिळणार आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होणार अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली होती. मात्र, झेंडू तोडणीच्या वेळीच आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फिरले आहे.
वास्तविक पाहता झेंडूची लागवड केली तेव्हा या परिसरात पाणी नव्हते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी डोक्यावर हंडा घेत झेंडू जगवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला निसर्गाने साथही दिली. मात्र, तोडणीच्या वेळेस आलेल्या परतीच्या पावसाने काही क्षणात होत्याचे नव्हते करून टाकले. शेतकऱ्यांनी हैदराबादला फुले विक्री देण्याची तयारी सुरू केली. मात्र, पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण नियोजन कोलमडले. दरवर्षी हैदराबाद या ठिकाणी 80 ते 90 रुपये किलो दराने विक्री होणारा झेंडू यंदा पावसामुळे स्त्यावर फेकून देण्याची वेळ झेंडू उत्पादक शेतकर्यांना आली आहे.
सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त झेंडू उत्पादक शेतकरी करत आहेत. सरकारने पिकाचा पंचनामा करुन योग्य तो मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
पाऊस खरीप पिकासाठी धोकादायक ठरला असला तरी ही रबीसाठी उपयोगाचा ठरण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यात सतत कोसळणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. ही नदी दरवर्षी केवळ पावसाळ्यातच दुथडी भरून वाहत आहे. मात्र, यंदा हिवाळ्यात पहील्यांदाच नदी दुथडी भरून वाहत आहे. नेहमीप्रमाणे नदीतून वाट काढणारी जनावरे नदीच्या प्रवाहासोबत वाहताना दिसून आले.
हेही वाचा - धनत्रयोदशीला सोने 'फिक्के'; विक्रीत सुमारे ४० टक्के घसरण