हिंगोली- जिल्ह्यातील शिरडशहापूर येथून काही अंतरावर आलेल्या जिनिंगजवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये जिनिंगमध्ये काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
दोन दुचाकीची समोरा-समोर धडक; एक ठार
हिंगोली - जिल्ह्यातील शिरडशहापूर येथून काही अंतरावर आलेल्या जिनिंगजवळ दुचाकीचा अपघात झाला.
अर्जुन ब्राह्मदेव तोरकड(वय ३० वर्षे, रा. दुराचीवाडी जि. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. किरण शिवाजी इंगोले (वय २५ वर्षे, रा. पांगारा शिंदे ) हा गंभीर जखमी झाला आहे. किरण हा (एम.एच. ३८ एल. २५५०) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता तर, अर्जून हा (एम. एच. २५ ए. बी. ११७२) या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना, दोन्ही दुचाकीचा समोरा-समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, अर्जुन तोरकड हा जागीच ठार झाला. या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घटनेची माहिती कळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अजून कोणतीही नोंद झालेली नाही.