महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली : मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज हिंगोलीत येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच यामध्ये काही महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी पोलीस ठाण्यात थांबावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

By

Published : Aug 30, 2019, 2:19 PM IST

Updated : Aug 30, 2019, 3:04 PM IST

पोलिसांनी ताब्यात घेतलेले कार्यकर्ते

हिंगोली - शहरात महाजनादेश यात्रा दाखल होणार आहे. यावेळी अनेकजण मुख्यमंत्र्यांसमोर वेगवेगळे प्रश्न निवेदन स्वरुपात मांडणार होते. त्यांना स्वतंत्र भेटून आपल्या समस्या सांगण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र, काही कळण्याच्या आतच काही कार्यकर्त्यांना हिंगोली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर अजूनही काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

हे वाचलं का? - पिकविम्याचं, कर्जमाफीचं बोला; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणाऱ्यांना पोलिसांनी उचलले

शहरात येणाऱ्या महाजनादेश यात्रेसाठी प्रशासन तसेच भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. खांब तेथे झेंडा, अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार म्हणजे आपले प्रश्न निश्चितच सुटणार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक आंदोलक तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करत थांबले होते. काहीजण विविध मागण्यांची निवेदने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी थांबले होते. मात्र, शहर पोलिसांच्यावतीने विविध पक्षाच्या पदाधिकांऱ्याच्या नावाने नोटीस बजावून त्यांना पोलीस ठाण्यात 149 कलमानुसार हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार काही कार्यकर्ते व पदाधिकारी स्वतः हजर झाले, तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मुख्यमंत्री येण्याच्या दिवशी धरपकड सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र चांगलाच गोंधळ उडाला. काही कार्यकर्त्यांना कशासाठी ताब्यात घेतले हे देखील माहिती नाही.

हे वाचलं का? - मराठवाड्यावर झालेला अन्याय दूर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​​​​​​​

पोळा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण आहे. मात्र, आज पोळा असताना देखील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्याकर्त्यांमध्ये काही महिलांचाही सहभाग आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी पोलीस ठाण्यांमध्ये थांबावे लागल्याने महिला संताप व्यक्त करीत आहे.

Last Updated : Aug 30, 2019, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details