महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी; रब्बीचे नुकसान

जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांच्या आजारात वाढ होत आहे. सोबतच गहू, हरभरा, ज्वारी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

heavy Rain in Hingoli
हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी

By

Published : Jan 2, 2020, 9:54 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री पाऊस झाला. शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले आहे.

हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी

हेही वाचा - कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया; गडचिरोलीत महिलेच्या अन्ननलिकेला इजा

जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांच्या आजारात वाढ होत आहे. सोबतच गहू, हरभरा, ज्वारी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे गव्हावर तांबेरा तर हरभऱ्यावर अळीचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.

हेही वाचा - हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 14 जणांवर गुन्हा दाखल

पहाटे हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांची पावसामुळे एकच धांदल उडाली.

ABOUT THE AUTHOR

...view details