महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उज्ज्वला योजना कचऱ्यात.. भाव वाढीच्या निषेधार्थ हिंगोलीत गॅसची मिरवणूक

उज्वला योजनेत मोफत दिलेल्या गॅसला आता 1100 रुपये मोजावे लागत आहेत. दुष्काळाने हाताला रोजगार नाही. त्यामुळे पैसे नाहीत. त्यात गॅससाठी एवढे पैसे कुठून आणायचे असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

gas-tank-rally-against-gas-price-increases-in-hingoli
भाव वाढीच्या निषेधार्थ हिंगोलीत गॅसची मिरवणूक...

By

Published : Feb 13, 2020, 10:17 PM IST

हिंगोली- उज्ज्वला योजनेनेच्या माध्यमातून सरकारने गॅस सिलेंडरचे मोफत वाटप केले. यातून अनेक घरे धूर मुक्त झाली. मात्र, आता गॅसचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस वापरने परवडत नाही. त्यामुळे कळमनुरीत गावकऱ्यांनी गॅसच्या टाकीची मिरवणूक काढत गॅस टाकी कचऱ्यामध्ये फेकून भाववाढीचा निषेध केला आहे.

भाव वाढीच्या निषेधार्थ हिंगोलीत गॅसची मिरवणूक...

हेही वाचा-चित्त्यांकडून शिकार करून घेतली जायची; छत्रपती घराण्यातील 'रॉयल गेम' - पाहा स्पेशल रिपोर्ट

दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे बेहाल होत आहेत. अशाच परिस्थितीत दैनंदिन उपयोगात येणाऱ्या गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. उज्ज्वला योजनेत मोफत दिलेल्या गॅसला आता 1100 रुपये मोजावे लागत आहेत. दुष्काळाने हाताला रोजगार नाही. त्यामुळे पैसे नाहीत. त्यात गॅससाठी एवढे पैसे कुठून आणायचे असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details