महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 2, 2020, 2:29 AM IST

Updated : Jan 2, 2020, 11:12 AM IST

ETV Bharat / state

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया; हिंगोलीतील महिलेच्या अन्ननलिकेला इजा

या महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह इतर डॉक्टराने नांदेड येथे धाव घेतली. तर अजून अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र, आमचा विभाग त्या महिलेवर लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हा आरोग्यधिकारी शिवाजी पवार यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.

Primary Health Center, Kawatha, Hingoli
प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठा, हिंगोली

हिंगोली - येथील शासकीय रूग्णालयात महिलेवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करताना तिच्या अन्ननलिकेला इजा झाल्याची घटना घडली. अर्चना रघुनाथ ढोले (वय ३२) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला सेनगाव तालुक्यातील वाढोना येथील रहिवासी आहे. अर्चना यांच्यावर महिलेवर सध्या नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुन्हा हिंगोलीच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया प्रकरण

या महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह इतर डॉक्टराने नांदेड येथे धाव घेतली. तर अजून अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र, आमचा विभाग त्या महिलेवर लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हा आरोग्यधिकारी शिवाजी पवार यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले. सध्या त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. डॉक्टरांनी अन्ननलिका कापल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी कला आहे. तसेच दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा - अकोल्यात 3 मजली इमारत कोसळली

अर्चना या 10 डिसेंबर रोजी सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याणशस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांच्यावर डॉ. बेले आणि डॉ. झाडे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती. मात्र, काही वेळातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. तेथील डॉक्टरांनी महिलेवर उपचार केले. मात्र, प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. यामुळे अर्चना यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. तेथेही 3 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तब्येतीत काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र, महिलेच्या जीवितास धोका असल्याचे नातेवाइकांना सांगत डॉक्टरांनी जबाबदारी घेतलेली नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

पीडित महिला

हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद

हिंगोली आरोग्य विभागाचे डॉक्टरांनी वर हात कर केले आहे. तसेच आम्हांलाच धमकावत असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. तर महिलेची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्चना यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी अशी अपत्ये आहेत. ते देखील आईची आतुरतेने घरी प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे अर्चना यांच्या सासऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

आरोग्य विभागाचे पुन्हा पितळे उघड -

या घटनेने पुन्हा एकदा हिंगोली येथील आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. 2 महिन्यांपूर्वीही एका अभिनेत्रीचा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आता ही घटना समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग खळबळून जागा झाला आहे.

Last Updated : Jan 2, 2020, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details