हिंगोली - जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे आज सकाळी 5 वाजल्यापासून परतवारीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी येथे परतवारी एकादशीनिमित्त शेकडो दिंड्या नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आल्या आहेत.
नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी नरसीत भाविकांची मांदियाळी
संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी येथे परतवारी एकादशीनिमित्त शेकडो दिंड्या नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. हेच भाविक आज संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत. आषाढी वारीनिमित्त अनेक संत मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते. यामध्ये विठ्ठलाचे लाडके भक्त म्हणून संत नामदेव महाराज हे सुद्धा जात होते. त्यामुळे पंढरपूरची वारी करणारे भाविक परत वारीसाठी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
नरसी येथे जवळपास 4 ते 5 लाख भाविक जमले आहेत. त्यामुळे पोलीस विभागाच्या वतीने अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी आज सकाळी 6 वाजता मंदिर जिर्णोध्दार समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी महाआरती करून नामदेव महाराजांचे दर्शन घेतले.