महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीतील तीनही विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

मागील अनेक दिवसापासून उमेदवारी घोषित होण्याकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे व उमेदवारांचे लक्ष लागले होते. अनेक इच्छुक हे विविध पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते. मात्र, भाजप, शिवसेना व काँग्रेस पक्षाने आपल्याच विद्यमान आमदांरावर विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.

By

Published : Oct 2, 2019, 10:43 AM IST

Updated : Oct 2, 2019, 11:31 AM IST

हिंगोलीतील तीनही विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात

हिंगोली- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती आणि आघाडीमध्ये जोरदार इन्कमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. मात्र या दोन्ही पक्षांकडून इन्कमिंग करणाऱ्यांऐवजी विद्यमान आमदारांवर विश्वास टाकले जात आहेत. युती आणि आघाडीकडून विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे.

मागील अनेक दिवसापासून उमेदवारी घोषित होण्याकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे व उमेदवारांचे लक्ष लागले होते. अनेक इच्छुक हे विविध पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते. मात्र, भाजप, शिवसेना व काँग्रेस पक्षाने आपल्याच विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.

यामध्ये कलमनुरी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार डॉ.संतोष टारफे तर वसमत मतदारसंघासाठी शिवसेनेकडून आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, हिंगोलीसाठी भाजपकडून विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच संधी दिल्याने, याच पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

हेही वाचा-हिंगोली येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ; मुख्य आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवाची तयारी सुरू

Last Updated : Oct 2, 2019, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details