महाराष्ट्र

maharashtra

राजीव सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री राहणार उपस्थित

राजीव सातव यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असून सोमवारी सकाळी 6 वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

By

Published : May 17, 2021, 1:13 AM IST

Published : May 17, 2021, 1:13 AM IST

cabinet minister are likely to present for funeral of rajiv satav
राजीव सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री राहणार उपस्थित

हिंगोली - खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असून सोमवारी सकाळी 6 वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 10 वाजता कळमनुरी येथे होणार आगमन -

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित राहणार असून ते सोमवारी सकाळी 8 वाजता नांदेड येथील शासकीय विश्राम गृह येथून मोटारीने हिंगोलिकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 10 वाजता कळमनुरी येथे आगमन होणार आहे. अंत्यविधी आटोपून पुन्हा हे सर्व मंत्री दुपारी 12 वाजता कळमनुरी येथून नांदेडकडे प्रयाण करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते.

हेही वाचा- खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, वाचा...

ABOUT THE AUTHOR

...view details