महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्यात विष टाकून शिक्षकाला मारण्याचा प्रयत्न

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील रमतेराम महाराज माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाच्या पाण्यात विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस तपास करत आहेत.

By

Published : Feb 27, 2020, 1:16 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील रमतेराम महाराज माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाच्या पाण्यात विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला. पाणी प्यायल्यानंतर त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. शिवाजी घुगरे, असे शिक्षकाचे नाव असून त्यांच्यावर वाशीम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वीही शिवाजी घोगरे यांना अशाच पद्धतीने पाण्यात विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, या प्रकाराने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिवाजी घोगरे हे रमतेराम महाराज विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यकरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शाळेवर वाद सुरू आहे. नेहमी प्रमाणे 24 फेब्रुवारी रोजी घुगरे हे पाणी पित असताना, पाण्यातून काही तरी उग्र वास येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानी तोंडात घेतलेले पाणी बाहेर फेकले. मात्र, काही वेळातच त्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रेफर केले होते. मात्र, घुगरे यांच्या नातेवाईकांनी वाशीम येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा वाशीम येथील शहर पोलिसांनी जाबाब घेतला. मला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोणीतरी पाण्याच्या बाटलीमध्ये विष टाकले असावे, असे त्यांनी सांगितले. या पूर्वी देखील घुगरे यांच्या सोबत अशीच घटना घडली होती. त्यामुळे नातेवाईकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमनवर हे करत आहेत. घुगरे यांची प्रकृती चांगली आहे. चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे निरिक्षक श्रीमनवर यांनी सांगितले.

हेही वाचा -हिंगोलीत ६० पोती पाणी पाऊच जप्त; नगरपालिका पथकाची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details