हिंगोली - सेनगाव तालुक्यात १३ सप्टेंबरला ३च्या सुमारास एका ६ वर्षीय मुलीला दुध आणण्यासाठी घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव जाधव असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -भिवंडीत विवाहितेवर दिरासह ४ जणांचा बलात्कार; नराधम अटकेत
पीडितेचे कुटुंब आरोपीच्या शेजारी वास्तव्यास आहे. दरम्यान, नराधमाने चिमुकलीला मुलीला दूध आणण्यासाठी घरात बोलवून तिच्या सोबत अश्लील चाळे करुन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. ही घटना मुलीने आईला सांगितली. त्यानंतर १५ सप्टेंबर (रविवारी) मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे वारंवार बलात्कार; आरोपींमध्ये पीडितेच्या आईचाही समावेश
या घटनेने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पालकात संतापाची भावना निर्माण झाली आहे. तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन गोरेगावचे पोलीस निरीक्षक झुंजारे यांनी दिले.