महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रादेशिक पक्ष संपविण्याचा भाजपचा डाव : मगो

दोन आमदार पक्ष सोडून गेले म्हणून मगो संपलेला नाही. मगोचे स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. तो कार्यकर्ते आणि मतदारांवर अवलंबून आहे. आम्ही पोटनिवडणूक लढविणार आहोत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्ताने निराश होऊ नये.

By

Published : Mar 27, 2019, 5:42 PM IST

दीपक ढवळीकर

पणजी - मगोचे आमदार फोडणे हा राजकीय दरोडा आहे. त्याबरोबरच प्रादेशिक पक्ष संपविण्याचा भाजपचा डाव आहे. याचा प्रादेशिक पक्षांनी विचार करणे गरजेचे आहे, असे मत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. आज मगोच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती.

दीपक ढवळीकर

'१९९४ पासून भाजपला साथ दिली. मात्र, भाजपने विश्वासघात करत रात्रीच्या वेळी आमचे दोन आमदार फोडले. २०१२ मध्ये युती करून भाजपला २१ आमदार निवडून आणण्यासाठी मदत केली. तर २०१७ मध्ये सरकार सरकार बनणे कठीण असताना समविचारी म्हणून साथ दिली. तरीही मगो आमदार फोडले याचा आम्ही निषेध करतो,' असे ढवळीकर म्हणाले.

'आज पक्षाची बैठक झाली असून लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी दक्षिण गोव्यातून आमदार सुदिन ढवळीकर यांना लोक उमेदवारीसाठी आग्रह करत आहेत. तर उत्तर गोव्यातून माजी आमदार नरेश सावळ यांनी निवडणूक लढवावी असे पक्षाचे मत आहे,' अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. येत्या दोन दिवसांत उमेदवार निश्चित केले जातील, असे ते म्हणाले.

दोन आमदार पक्ष सोडून गेले म्हणून मगो संपलेला नाही. मगोचे स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. तो कार्यकर्ते आणि मतदारांवर अवलंबून आहे. आम्ही पोटनिवडणूक लढविणार आहोत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने निराश होऊ नये. यापूर्वी पक्ष अनेकदा फुटला. पण जोपर्यंत मतदार आणि कार्यकर्ते मगोसोबत आहेत तोपर्यंत पक्षाला भवितव्य आहे, असे सांगत ढवळीकर म्हणाले, आमची पक्षांतरविरोधातील लढाई कायम राहणार असून याविरोधात याचिका दाखल करणार आहोत.

भाजपला निवडून न येण्याची भीती

गोव्यात आता भाजप आमदार निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अन्य पक्षातील आमदार फोडून भाजपात घेतले जात आहेत, अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.
मगो कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details