गोंदिया - सडक अर्जूनी तालुक्यातील नैनपूर येथील शिवारातील एका विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले. दोन तासाच्या रेस्क्यु ऑपेरेशननंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रानडुकराला विहिरीतून काढण्यात वनविभाला यश आले.
विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाने दिले जीवदान
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपेरणीला सुरुवात झाली असून वन्यप्राणी शेतात येवून धानपिकाची नासाडी करत आहेत. असेच धानाचे परे खायला आलेला रानडुकर कठडे नसलेल्या विहिरीत पडला. या विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले.
नैनपूर येथील शिवारातील श्रीधर मुंगुलमारे यांच्या शेतातील विहिरात रविवारी रात्री रानडुकर विहिरीत पडला. आज सकाळी श्रीधर मुंगुलमारे हे विहिरीवर गेले असता विहिरात रानडुकर पडल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रेस्कू टिमच्या माध्यमातून तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून रानडुकराला बाहेर काढले. त्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपेरणीला सुरुवात झाली असून वन्यप्राणी शेतात येवून धानपिकाची नासाडी करत आहेत. ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त असून रानडुकरांचा बांदोबस्त करण्याची मागणी आता शेतकरी करू लागाले आहेत.